नांदेड :
नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार जनसंवाद व पत्रकारिता विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठस्तरीय एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन दिनांक १० सप्टेंबर रोजी सिद्धार्थ महाविद्यालय आणि शिक्षण प्रबोधिनी नांदेड येथे करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमास डॉ.डी.एन.मोरे (व्यवस्थापन परिषद सदस्य, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड) डॉ.चंद्रकांत बाविस्कर (अधिष्ठाता,आंतरविद्याशाखीय अभ्यासशाखा स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.) डॉ.राजेंद्र गोणारकर (संचालक तथा BOS चेअरमन, वृत्तपत्रविद्या विभाग स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड) डॉ.सुहास पाठक (BOS सदस्य, वृत्तपत्रविद्या विभाग), डॉ.बालाजी शिंदे (BOS सदस्य, वृत्तपत्रविद्या विभाग), डॉ.रामानंद व्यवहारे (BOS सदस्य, वृत्तपत्रविद्या विभाग), आदी मार्गदर्शक नवीन अभ्यासक्रमावर सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सोबतच डॉ. पराग खडके (अधिष्ठाता, मानव्यविज्ञान विद्याशाखा, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.) डॉ.डी.एम.खंदारे (संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, स्वा.रा.ती.म.विद्यापीठ, नांदेड.) आदी मान्यवर या कार्यशाळेत उपस्थित राहून राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप गोणारकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment