तालुक्याच्या सर्वांगीण विकासात व्यंकटराव नेम्मानिवार यांचे योगदान महत्त्वाचे -खा.अशोकराव चव्हाण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 2 October 2024

तालुक्याच्या सर्वांगीण विकासात व्यंकटराव नेम्मानिवार यांचे योगदान महत्त्वाचे -खा.अशोकराव चव्हाण


किनवट,दि.२: तालुक्याच्या शिक्षण,सहकार, पत्रकारिता, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार यांचे मोलाचे योगदान आहे.नेता म्हणून मी त्यांना व निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांनी  मला नेहमीच सहकार्य केले आहे.येत्या काळातही शहराच्या व तालुक्याच्या विकासासाठी माझे सहकार्य त्यांना नेहमीच असेल, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिली.

     माजी नगराध्यक्ष व शिक्षण व सहकार महर्षी व्यंकटराव नेम्मानिवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त आज(ता.२)कलावती गार्डन मध्ये झालेल्या एका शानदार सोहळ्यात व्यंकटराव नेम्मानिवार यांचा सपत्नीक सत्कार अशोकराव चव्हाण हस्ते करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षीय समारोप करतांना बोलत होते.यावेळी आमदार भीमराव केराम यांनीही  व्यंकटराव नेम्मानिवार यांच्या कार्यकृत्वावर प्रकाश टाकला.

   मंचावर आमदार अमर राजूरकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आनंद गुंडिले, नामदेवराव केशवे,अशोक पाटील सूर्यवंशी, गंगन्ना नेम्मानिवार,धरमसिंग राठोड आदि मान्यवरांची उपस्थिती होती.

  प्रा.तपन मिश्रा व प्रोफेसर डाॅ. मार्तंड कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

  प्रारंभी महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री व सरस्वती देवी प्रतिमांचे पुजन करून  व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.स्वागत गित-सरस्वती स्वरताल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गायीले.प्रास्ताविक- प्राचार्य डॉ.आनंद भंडारे यांनी केले.कार्यक्रमास तेलंगाना, आंध्र प्रदेशसह किनवट व माहूर तालुक्यातील विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते,नेम्मानिवार यांचे नातेवाईक व मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यशस्वीतेसाठी संयोजन समितीने पुढाकार घेतला होता.यात प्रा.डाॅ.सुनिल व्यवहारे, प्रा.थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता.

No comments:

Post a Comment

Pages