किनवट : डोंगरगाव(ता.किनवट) शिवारातील पहाडपट्टीचा फायदा उचलून काही शेतकर्यांनी गांजाच्या शेतीवर जोर दिला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरुन नांदेड, किनवट व इस्लापूर पोलीसांसह कृषी विभाग, महसूल विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने गांजा शेतीवर धाड घालून २४ लाख ८४ हजार ९०० किंमतीचा गांजा पकडला व गांजाचे उत्पन्न घेणार्या सहा जनांविरुद्ध गुन्हा नोंदविला. यातील तीन आरोपींना ताब्यात घेतले, तर तीन आरोपींनी पलायन केले आहे.
निळकंठ विश्वनाथ शेळके (वय ४०), संजय गोविंद हुरदुके (वय ३५), विनोद शिवाजी हुरदुके (वय ४०), राजाराम शिदोबा बावदाने, कोंडीबा गायनाजी बावदाने, ईश्वरदास किसन हुरदुके यांनी गांजाची शेती केल्याची माहिती पोलिस,कृषी,वन व महसूल प्रशासनाला मिळाली. त्यावरुन पोलीस, महसूल, वनविभाग आणि कृषी विभागाच्या संयुक्त कारवाईत ४९६ किलो ९०० ग्राॅम गांजा पकडला.पोलिसांनी निळकंठ शेळके, संजय हूरदुके व विनोद हूरदुके यांना ताब्यात घेतले, तर राजाराम बावदाने, कोंडीबा बावदाने आणि ईश्वरदास हूरदुके हे फरार झाले आहेत.
No comments:
Post a Comment