किनवट: भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आज दि. २६नोहेंबर२०२४रोजी सकाळी ठिक 11 वाजता संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.प्रारंभी संविधान निर्माते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी संविधान प्रास्ताविकाचे सामुहिक वाचन करून उपस्थितांना संविधानाचे महत्व सांगत संविधानाचे आपणास हक्क आणि अधिकार दिले आजच्या दिनी आपन जागृत राहून संविधानाचे पालन व संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन केले.
हा कार्यक्रम भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.कार्यक्रमास संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे, पत्रकार विवेक ओंकार, जेष्ठ उपासक मल्लु येरेकार,श्रामणेर बौद्धाचार्य भगवान मुनेश्वर , प्रा.दिलीप पाटील, भीम आर्मी तालुका अधक्ष सिद्धांत खोब्रागडे यांच्या सह बौद्धाचार्य गंगाधर कदम, बौद्धाचार्य एन.एस.गायकवाड,नामदेव वासानटे, रामराव वाठोरे, पत्रकार त्र्यंबक पुनवटकर, पत्रकार सचिन जाधव आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment