नांदेड : बहुजन युथ पँथर नांदेड जिल्हा आयोजित संविधान दिन २६ नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले.
नांदेड तालुक्यातील नविवाडी,मरळक,एकदरा याठिकाणी दिनांक ३० - ११ - २०२४ रोजी सकाळी ११ : ०० वाजता वार शनिवार रोजी शालेय साहित्य वाटप चे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या शाळेतील मुख्याध्यापक व सरपंच यांची उपस्थीती लाभणार आहे. तर या कार्यक्रमात संविधानाने दिलेल्या संधी याविषयी मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.
या कार्यक्रमाची सुरूवात संविधानाची प्रस्ताविकाचे वाचन करून होणार आहे.संविधान प्रास्ताविक वाटप करण्यात येणार आहे असे भिमराव बुक्तरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment