किनवट :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुक-2024 किनवट- माहूर 83-मतदानसंघ अंतर्गत किनवट नगरपरिषद नवीन प्रशासकिय ईमारत या ठिकाणी मतदानाचे हक्क बजावण्याकरिता ३ पोलिंग बोथ १८३,१८५,२०८ असून मतदानाचे आपले कर्तव्य बजावणे करीता जास्तीत-जास्त नागरिकांनी सहभाग होणेसाठी, लोकशाहीचा उत्सव आनंदात साजरा करण्याकरिता मा.मुख्याधिकारी तथा सहायक निवडणुक अधिकारी, श्री डॉ.अजय कुरवाडे यांचे संकल्पना आणि मार्गदर्शना खाली पर्यावरण पुरक साधनाचा वापर करुन आकर्षक बूथ तयार करण्यात आला आहे. त्यामध्ये सुरवातीला मुख्य प्रवेश दरवाजाला वेगवेगळ्या रंगाचे फुग्याची सजावट करण्यात आले असून, आकर्षक टेन्ट, मतदान जनजागृती कमान,सेल्फी पाँईट,मतदान करण्यासाठी रांगोळी मध्ये आव्हान,वारली पेंटिंग, विविध प्रकारचे वृक्ष लावून सजावट, मतदान केंद्राच्या आतमध्ये प्रवेश करतांना बांबू फुलांची सजावट करून आकर्षक झोपडी बनविणेत आली येणाऱ्या प्रत्येक मतदारासाठी राष्ट्रिय प्राणी वाघ या चित्राचे दर्शन दाखवण्यात आले असून मतदानाचा हक्क बजावणेचे आवाहन करताना चे आकर्षक चित्र समोर दर्शवले या आकर्षक सजावटीसाठी नगरपरीषद कार्यालयीन अधिक्षक तथा अभियंता श्री.अशोक भालेराव, शहर समन्वयक स्टालिन आडे, राजू पिल्लेवार,सर्वेश आणलावार, रांगोळी काढणारी ऐश्वर्या धात्रक,अनिल माहूरकर, जमीर, रियाझ,राजेश ब्राह्मणे,अमोल पिंपळे सह इतर कर्मचारी यांनी अतोनात प्रयत्न केले.
सदर मतदान केंद्रावर नागरिकांनी मतदान झाले नंतर नागरिकांना कौतुक करत सेल्फी,फोटो घेणेचा आनंद घेतला. या सजावटीमुळे निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमती मेघना कावळी IAS, निवडणुक निरीक्षक श्री. शैलेंद्र कुमार IAS यांनी विशेष करून भेट देवून सर्वांचे कौतक केले.
No comments:
Post a Comment