नांदेड : राज्यातील पत्रकारांसाठी राज्य शासनाने स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करावे अशी मागणी नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार तथा विधानपरिषद शिवसेना गटनेते हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये विशेष उल्लेखाद्वारे केली आहे. विधानपरिषद सभागृहात हि मागणी पटलावर ठेवून पुढील उचित कार्यवाहीसाठी सभागृहाने सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविले आहे.
राज्यामध्ये सद्यस्थितीत १४० पेक्षा जास्त पत्रकार संघटना काम करतात, पण त्यांना काम करत असताना मर्यादा येतात. आज स्थितीत लाखो पत्रकार प्रिंट व इलेट्रॉनिक मीडियामध्ये प्रत्यक्ष काम करत आहेत त्यासोबतच पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या पत्रकारांची संख्या पण उल्लेखनीय असून हि संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . आणि त्यासोबतच त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे . सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी पत्रकार बांधव सातत्याने काम करत असतात . परंतु त्यांच्या मागण्यांची दखल कुठे कोणी घेताना दिसत नाही. पत्रकारांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी त्यांना स्वतःच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पत्रकार सुद्धा एक समाजाचा घटक आहे. त्यामुळे पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन केल्यास त्यांना त्याचा फायदा होईल. राज्यात अनेक वेगवेगळे कल्याणकारी मंडळ तसेच महामंडळ कार्यरत आहेत. त्याच धर्तीवर पत्रकार बांधवांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केल्यास त्याचा फायदा राज्यातील सर्व पत्रकार बांधवाना होईल . कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी यांनी पत्रकार बांधवांना दिले होते. त्यामुळे पत्रकार बांधवासाठी स्वतंत्र पत्रकार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, अशी मागणी आमदार तथा विधान परिषद शिवसेना गटनेते हेमंत पाटील यांनी विशेष उल्लेखाव्दारे केली असून पुढील कार्यवाहीसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment