मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाही करा - सकल मराठा समजाची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 23 December 2024

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन कठोर कारवाही करा - सकल मराठा समजाची मागणी


 किनवट प्रतिनिधी : 

मस्साजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यास तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सहाय्यक जिल्हा अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी व पोलीस स्टेशन कार्यालय किनवट येथे निवेदन देण्यात आले 

1 डिसेंबर 2024 रोजी मसाजोग तालुका केज जिल्हा बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून क्रूर व निर्दयी पणे हत्या करणाऱ्या सर्व आरोपीस तात्काळ अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी किनवट यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना करण्यात आली. 


या निवेदनावर सुरेश सोळंके पाटील, सचिन कदम, आकाश इंगोले, अजय कदम पाटील, संतोष डोंनगे, विक्रम पवार , वैभव हजबे,  बबन वानखेडे, बाळासाहेब यादव , दत्ता नरवाडे , बालाजी आंकडे, नंदकिशोर जामगे , उमाकांत कराळे ,सुमित माने , शिवा पवार, संदीप कदम ,कृष्णा वरुडे ,आदींच्या स्वाक्षऱ्या  आहेत.

No comments:

Post a Comment

Pages