व्हॉइस ऑफ मीडिया च्या तालुकाध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार सचिवपदी सुरेश कावळे यांची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 4 December 2024

व्हॉइस ऑफ मीडिया च्या तालुकाध्यक्षपदी जगदीश सामनपेल्लीवार सचिवपदी सुरेश कावळे यांची निवड


किनवट - पत्रकारांची आंतरराष्ट्रीय संघटना  व्हॉइस ऑफ मीडिया किनवट शाखेची बुधवारी (४ डिसेंबर) वार्षिक सर्व साधारण सभा पार पडली. सदर बैठकीत नविन कार्यकारीणी तयार करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी  जगदीश सामनपेल्लीवार तर सचिवपदी सुरेश कावळेंसह सर्व पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश जोशी आणि इत्तर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत त्यांनी शिक्कामोर्तब केला.

     व्हाॅईस आँफ मीडियाच्या किनवट तालुका शाखेची ४ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या गोकुंदा येथिल विश्रामगृहात वार्षिक सर्व साधारण सभा जगदीश सामनपेल्लीवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मागिल वर्षभरातील कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. तदोपरांत २०२४-२०२५ एक वर्षासाठी कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष म्हणून दुसर्‍यांदा जगदीश सामनपेल्लीवार तर सचिव म्हणून सुरेश कावळेंची निवड करण्यात आली. 

उपाध्यक्ष संतोष सिसले ,  उपाध्यक्ष विवेक ओंकार, सहसचिव सम्यक सर्पे, सहसचिव दत्ता जायभाये,

कोषाध्यक्ष अनिल भंडारे, सदस्य प्रशांत सातूरवार, संतोष अनंतवार, शुभम शिंदे

सल्लागार - बी.एल.कागणे, ॲड. मिलींद सर्पे, शकील बडगुजर, गोकुळ भवरे, आशिष देशपांडे यांची आवाजी मतदान व हातवरती करून निवड  झाली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी राज्य सरचिटणीस श्रीनिवास भोसले, जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश  जोशी नांदेड. जिल्हा कार्यकारणी अविनाश चमकुरे, डॉ .प्रवीणकुमार सेलूकर, डॉ. भगवान सूर्यवंशी, आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages