जीवनदीप महाविद्यालय खर्डीस नॅक 'बी' ग्रेड प्राप्त - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 14 December 2024

जीवनदीप महाविद्यालय खर्डीस नॅक 'बी' ग्रेड प्राप्त


ठाणे :

जीवनदीप शैक्षणिक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खर्डी ता शहापूर जि ठाणे येथे दिनांक ४ व ५ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाकरिता डॉ व्ही. दुर्गा भवानी ( तिरूपती) , डॉ‌.एस वसंथा ( चेन्नई) ., डॉ हारेन साकिया ( आसाम) यांच्या त्रिसदस्यीय समितीने भेट देऊन मागील पाच वर्षांच्या कामकाजाचा आढावा सात घटकांच्या आधारे घेतला.त्याच बरोबर विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी, संस्था प्रतिनिधी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. यात महाविद्यालयाने पहिल्याच प्रयत्नात बी ग्रेड प्राप्त केला.यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला.

या महाविद्यालयाची स्थापना  २००८ साली जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून श्री रविंद्र घोडविंदे सर यांनी केली होती. खर्डी सारख्या आदिवासी बहुल व दुर्गम  भागात ज्ञानदानाचे कार्य महाविद्यालययाच्या माध्यमातून केले जाते. महाविद्यालय हे विनाअनुदानित असून गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची  तडजोड  केली जात नाही. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.रविंद्र घोडविंदे, सौ.स्मिता घोडविंदे , श्री. प्रशांत घोडविंदे, श्री.अनिल घोडविंदे,प्र.प्राचार्य कैलास कळकटे यांनी महाविद्यालाचे अभिनंदन केले. प्रा विशाल भोसले यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. तर सगळ्याच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या प्रक्रियेसाठी अतिशय परिश्रम घेतले.



No comments:

Post a Comment

Pages