संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्या - किनवट च्या संविधनप्रेमी जनतेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 13 December 2024

संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा द्या - किनवट च्या संविधनप्रेमी जनतेची मागणी


किनवट  दि 13 :  परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरू सोपान पवारवर  देशद्रोहाचा गुन्हा नोंदवुन  गुन्हा दाखल करून  फाशीची शिक्षा देण्यात यावी.

 अशी मागणी  किनवट च्या संविधनप्रेमी जनतेच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या घटनेमुळे संविधान प्रेमींच्या च्या भावना दुखावल्या आहेत.संविधान व महापुरुषांचा अवमान होत असून अश्या विकृत घटना घडू नये यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावीत .

 या घटनेचा संविधानप्रेमी व आंबेडकरप्रेमींच्या वतीने निषेध करण्यात आला .

परभणी व परिसरातील बौद्ध वस्त्यांवर हल्ला करून पकडण्यात आलेल्या युवकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेऊन त्यांची सुटका करण्यात यावी . घटनेमागचा मुख्य सूत्रधार कोण आहे त्याचा शोध घेऊन कठोर कारवाही करावी . 

यावेळी  निखिल कावळे, विशाल हलवले, दया पाटील , सम्राट कावळे  , राहुल सर्पे , सचिन कावळे ,सुरेश मुनेश्र्वर, आकाश सर्पे ,सुमेध कापसे ,गौतम पाटील , सुमेध रावळे, बंटी भवरे , संदीप दोराटे ,  विनोद ठोके  आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages