नांदेड : परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक करून तेथील भारतीय संविधान प्रतिकृतीची तोडफोड ( विटंबना ) करणाऱ्या आरोपीस कठोर कारवाई करण्यात यावी.१० डिसेंबर रोजी मानवाधिकार दिन होता त्यादिवशी आपल्याला अधिकार दिलेल्या महामानवाची व संविधानाची विटंबना होते हे निषेधार्थच आहे.
या प्रकरणी कोण कर्ता करविता आहे याचाही शोध घ्यावा. व त्याला कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे भविष्यात असे कृत्य करण्याची हिंमत करणार नाही.
अन्यथा आंबेडकरी, संविधानवादी, आरक्षणवादी जनता रस्त्यावर उतरुन मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्रला काळीमा फासणारी घटना घडली त्यामुळे आंबेडकरी अनुयायी यांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं अरोपिस कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे नांदेड येथे देण्यांत आलें. यावेळी बहुजन युथ पँथर जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे ,विक्रांत बिऱ्हाडे ,सुनील गायकवाड, आनंद पाटिल अविनाश बुक्तरे, भटक्या विमुक्त महासंघ चे राज्य उपाध्यक्ष देविदास हादवे आदी सह अनेकांची उपस्थिति होती.
No comments:
Post a Comment