महापरिनिर्वाण दिना निमित्य नांदेड शहरात विक्कीभाऊ वाघमारे युवा मंच च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 5 December 2024

महापरिनिर्वाण दिना निमित्य नांदेड शहरात विक्कीभाऊ वाघमारे युवा मंच च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन



 नांदेड :

    महाराष्ट्रात दर दिवशी साधारणपणे ४५०० ते ५०००           गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्ताची निकड भासते .सदर बाबा विचारात घेता  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या   महापरिनिर्वाण दिना  निमित्य  शहरात  विक्कीभाऊ  वाघमारे  युवा मंच  च्या वतीने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर ,फायर स्टेशन  जवळ ६डिसेंबर सकाळी  १० वाजता भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . यंदाचे हे पाचवे वेश आहे , तसेच सायंकाळी ७ वाजता पणतीज्योत रॅली चे  आयोजन करण्यात आले आहे.

       भीतीमुळे रक्तदान करण्यास घाबरू नये,गरजू रुग्णांसाठी रक्तदान करून त्यांचे प्राण वाचविण्याच्या उदात्त कार्यास अनमोल सहकार्य करावे असे आवाहन   विक्कीभाऊ  वाघमारे  युवा मंच चे छकुल कांबळे, आकाश खरात ,साई पाटील , सोनू इंगोले, पिराजी गायकवाड, अविनाश  शेंडे , अभी कोल्हे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages