25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 22 January 2025

25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम 25 जानेवारी रोजी राबविण्याबाबत आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना सर्व विभागप्रमुखांना सूचना केल्या. येत्या 25 जानेवारी रोजी 15 वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा होत आहे. 


या संदर्भात भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मतदारांनी या दिवशी प्रतिज्ञा दिली जाते. तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवमतदारांना निवडणूक ओळखपत्र देणे, मतदारांची संख्या वाढविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करणे, राज्य, जिल्हा व मतदान केंद्रस्तरावर या निमित्त विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करणे असे या आयोजनाचे स्वरूप असते. जिल्ह्यामध्ये या दिवसाचे औचित्य साधून मतदान जनजागृती अभियान राबवावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment

Pages