नांदेड, दि. २७ जानेवारी : जिल्हास्तरावरील गेल्या चार वर्षातील क्रीडा पुरस्काराचे वितरण प्रजासत्ताक दिनाच्या पर्वावर राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड मार्फत नांदेड जिल्हयात दरवर्षी जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरीत करण्यात येते. यामध्ये जिल्हयातील गुणवंत क्रीडा मार्गदर्शक, व गुणवंत खेळाडू पुरुष, महिला व दिव्यांग यांनी केलेल्या कार्य योगदानाला गौरव केला जातो. .
जिल्हा क्रीडा पुरस्कारामध्ये क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू (पुरुष, महिला व दिव्यांग) यांना सन 2020-21, 2021-22, 2022-23, व 2023-24 (04 वर्षे) अतुल सावे, पालकमंत्री, मा.खा.अशोक चव्हाण, राज्यसभा सदस्य तथा माजी मुख्यमंत्री,खा.डॉ. अजित गोपछडे, राज्यसभा सदस्य यांचे शुभहस्ते वितरीत करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, शहाजी उमाप, पोलीस महानीरिक्षक, नांदेड, मिनल करनवाल ,मुख्य कार्यकारी अधिकारी,अबिनाश कुमार जिल्हा पोलीस अधिक्षक, डॉ.महेशकुमार डोईफोडे आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, महेश वडदकर निवासी उपजिल्हाधिकारी, जयकुमार टेंभरे जिल्हा क्रीडा अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा पुरस्कार वर्षेनिहाय वितरीत करण्यात आलेल्या पुरस्कारार्थीची नांवे पुढीलप्रमाणे आहेत.
सन 2021-22 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष).सुशिल गणेशराव कुरुडे- जिम्नॅस्टिक्स, सन 2022-23 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (पुरुष) डॉ. अनिल सुरेंद्र पाटील- जिम्नॅस्टिक्स, सन 2023-24 करीता गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (महिला) श्रीमती वैशाली बालाजी पाटील जोगदंड-आर्चरी, तर गुणवंत खेळाडू म्हणुन सन 2020-21 मार्तंड बालाजी चेरले (पुरुष)-आर्चरी, कु.अंजली अशोकर भालेराव (महिला)- जिम्नॅस्टिक्स, सज्जन सुभाष गयाबाई भिमराव (दिव्यांग) मैदानी, सन 2021-22 आकाश मारोती बगाटे (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स, कु.आकांक्षा मारोती सोनकांबळे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, गिरबनवाड योगेश निर्मलाबाई गणपतराव (दिव्यांग)- मैदानी, सन 2022-23 जहागीरदार तेजबीरसिंघ चरणकमलजीतसिंघ (पुरुष)- आर्चरी, कु.सौख्या स्वप्ना घेवारे (महिला)- जिम्नॅस्टिक्स, दत्ता व्यंकाबाई देऊबुभा भारती (दिव्यांग)- मैदानी, सन 2023-24 पुजारी कैवल्य कैलास (पुरुष)- जिम्नॅस्टिक्स, कु.सृष्टी बालाजी जोगदंड (महिला)- आर्चरी व पॅरा बॅडमिंटन या खेळामध्ये पॅरा जागतीक वर्ल्ड चॅम्पीयनशिप सन 2022 (टोकीयो- जापान)- ब्रांझ मेडल, 2) पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड ॲबीलीटी क्रीडा स्पर्धा सन 2023 (थायलंड)- तृतीय क्रमांक 3) पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पीयनशिप सन 2024 (थयलंड)- सहभाग, या स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केलेले असल्याने त्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने सहाय्यक क्रीडा अधिकारी या पदावर थेट नियुक्ती दिलेली असल्यामूळे त्याच धर्तीवर नांदेड जिल्हयाचा जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023-24 गुणवंत खेळाडू (दिव्यांग) म्हणुन कु.लताताई प्रमेश्वर उमरेकर दिव्यांग बॅडमिंटन यांना थेट पुरस्कार सन 2023-24 चा मान्यवरांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात आला.
No comments:
Post a Comment