किनवट तालुक्यातील रेशनच्या धान्याच्या मापात पाप क्विंटलमागे तिन ते चार किलो धान्य कमी, दुकानदारांना नुकसान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 24 January 2025

किनवट तालुक्यातील रेशनच्या धान्याच्या मापात पाप क्विंटलमागे तिन ते चार किलो धान्य कमी, दुकानदारांना नुकसान

किनवट  : किनवट,मांडवी व इस्लापूर या तालुक्यातील तीन शासकीय गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना द्वारपोच होणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामध्ये क्विंटलमागे तिन ते चार किलो धान्य कमी येत असून यामुळे तालुकाभरात द्वारपोच अन्नधान्य योजनेच्या मापात पाप असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

   राज्यात कोणीही उपाशी राहू नये, त्यांना कमी पैशात अन्नधान्य उपलब्ध व्हावे. त्यांचा आर्थिक स्तर उंच व्हावा म्हणून शासनाने गरिबातल्या गरीब नागरिकांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा ही योजना सुरू केली. यासाठी अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत गहू व तांदूळ देण्याचा निर्णय तत्कालीन केंद्र सरकारने घेतला. तेव्हापासून नागरिकांना मोफत धान्य वितरित केल्या जात आहे. पण शासनाच्याच शासकीय गोदामातून द्वारपोच होणाऱ्या अन्नधान्य पुरवठ्यामध्ये एका पोत्यामागे दोन ते तीन किलो धान्य कमी येत आहे. अन्नधान्य कमी येत असल्यामुळे दुकानदारांना नुकसान झेलावे लागत आहे.पर्यायाने त्या नुकसानीचा फटका गोरगरीब लाभार्थ्यांना बसत आहे.

No comments:

Post a Comment

Pages