किनवट :
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी या हेतूतून प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जातात तसेच यावर्षी देखील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस विष्णुपरी नांदेड या ठिकाणी दिनांक 09/01/2025 ते 11/01/2025 यादरम्यान जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनामध्ये किनवट येथील श्री मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय शिक्षण संस्था अंतर्गत माध्यमिक विद्यालय कोठारी ची येथील ओंकारेश्वर दत्ता राठोड इयत्ता नववी या विद्यार्थ्याने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये आदिवासी विभागातून प्रथम क्रमांक मिळवला असून या विद्यार्थ्यास सर्वस्वी मार्गदर्शन विज्ञान विषयाचे अध्यापक प्रा. तुषार नरवाडे , पाटील एस. एच व शहबाज शेख सर यांनी केले असून जिल्हास्तरीय विज्ञान विज्ञान प्रदर्शनात आदिवासी विभागातून प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अभि.प्रशांतजी ठमके , राठोड गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती किनवट ,अनिल महामुने,उत्तम कानिंदे अंबादास जुनगुरे,पी. जी. मुनेश्वर ,राधेश्याम जाधव, संतोष ठाकूर आदींनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment