नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाच्या वतीने सोमवारी (6 जाने.) मराठी पत्रकार दिन तथा दर्पण दिनाच्या निमित्ताने आज विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापक तथा ज्येष्ठ माध्यमतज्ञ डॉ. विश्राम ढोले हे "डिजिटल युगातील पत्रकार पत्रकारितेचे बदलते संदर्भ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. माध्यमशास्त्र संकुलात दुपारी दोन वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कुलगुरु डॉ. मनोहर चासकर हे भूषविणार आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांनी बनवविलेले लघुपट देखील दाखविण्यात येणार आहेत.
या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, डॉ. दीपक शिंदे, डॉ. सुहास पाठक, डॉ. सचिन नरंगले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment