दाभड येथे १३ व १४ जानेवारी रोजी ३८व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 2 January 2025

दाभड येथे १३ व १४ जानेवारी रोजी ३८व्या अ. भा. बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन


नांदेड ( दाभड)  दि. ०२: ३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेसाठी उभारण्यात येणार्‍या सभा मंडपाचे भूमिपूजन महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे रविवार, दि. ५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ठिक ३ : ०० वाजता संपन्न होणार आहे. 

              भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा शाखा महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड व नांदेड वासियांच्या संयुक्त विद्यमाने महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दि. १३ व १४ जानेवारी २०२५ रोजी ३८ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी लाखो उपासक उपसिका धम्म परिषदेत संमिलित होत दिवसरात्र धम्म देसनेचे श्रवण करीत असतात. त्यांचे सोयीसाठी मोठ्या मंडपाची उभारणी करण्यात येत असते.  

         याच अनुशंघाने धम्म परिषदेनिमित्त उभारण्यात येणार्‍या सभा मंडपाचे भूमिपूजन दि. ५ जानेवारी २०२५ रोजी दु. ३ : ०० वाजता पू. भदंत धम्मसेवक महाथेरो यांच्या उपस्थितीत पू. भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक बांधकाम विभाग नांदेडचे अधीक्षक अभियंता मा. आयु. संभाजी धोंडीबा धोत्रे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महाथेरो, भदंत डॉ. खेमधम्मो महाथेरो, भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खू डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भिक्खू दयानंदजी महाथेरो, भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खू अश्वजीत थेरो, भिक्खू शीलरत्न थेरो, भिक्खू रेवतबोधी थेरो, भिक्खू बुद्धभूषण व पूजनीय भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे. 

          सदर कार्यक्रमास उपासक - उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म देसनेने व धम्म कार्याने लाभान्वित व्हावे, असे आवाहन संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages