विद्यापीठात 'फोटोग्राफी आणि फिल्ममेकिंग' या विषयावर उद्या कार्यशाळा व पोस्टर प्रदर्शन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 31 December 2024

विद्यापीठात 'फोटोग्राफी आणि फिल्ममेकिंग' या विषयावर उद्या कार्यशाळा व पोस्टर प्रदर्शन


नांदेड : समाजात दिवसेंदिवस 'फोटोग्राफी आणि चित्रपटनिर्मिती' यांचे महत्त्व वाढत आहे. तरुण विद्यार्थी या क्षेत्रामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. त्यांना योग्य ती दिशा मिळावी या हेतूने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा, वाड्.मय व संस्कृती अभ्यास संकुल आणि माध्यमशास्त्र संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने 'फोटोग्राफी आणि डॉक्युमेंटरी फिल्ममेकिंग' या विषयावर 01 व 02 जानेवारी रोजी कार्यशाळेचे आयोजित करण्यात आले आहे.

अलिकडे स्मार्टफोनच्या माध्यमातून अद्यावत दर्जाचे छायाचित्रण शक्य असले तरी छायाचित्र आणि चित्रपटनिर्मिती यातील तंत्र हे अवगत करणे आवश्यक आहे. याच हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.

या कार्यशाळेसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार आणि माहितीपटनिर्माते संदेश भंडारे (पुणे) यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. संदेश भंडारे यांनी 'तमाशा', 'वारी',  'महाराष्ट्र राज्य',  'पुणे शहर' या विषयावरती उत्कृष्ट दर्जाचे 

छायाचित्र संग्रह पुस्तकरूपाने प्रसिद्ध केलेले असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


 तसेच याचवेळी संदेश भंडारे यांच्या कॅमेरातून टिपलेल्या छायाचित्रांचे " वारी आनंदयात्रा" हे पोस्टर प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी अकरा वाजता कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन मुख्य मुख्य प्रशासकीय इमारतीत दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार,कार्यशाळा व पोस्टर प्रदर्शनचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.  डी. डी.  पवार, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. राजेंद्र गोणारकर व भाषा व वांग्मय संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages