भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 31 December 2024

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन


नविन नांदेड - वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिण महानगर च्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी ६ः३० वाजता वसरणी येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेची सुरवात महादेव मंदिर वसरणी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक - नवीन कौठा - जुना कौठा - म.फुले चौक वसरणी - सुजाता बौद्ध विहार वसरणी येथे समारोप होणार आहे.

       स्पर्धेतील विजेत्यास प्रथम,द्वितीय व तृतीय असे पारितोषिक असून अनुक्रमे ३ हजार रु,२ हजार रु, व १ हजार रु. देण्यात येणार आहेत, तसेच ही स्पर्धा पुरुष व महिला अशा दोन गटात विभागली जाईल. सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देण्यात येईल.

     तरी या स्पर्धेत जास्तीत-जास्त शहरातील युवक-युवतींनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक शुध्दोधन  कापसीकर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages