साने गुरुजी जयंती निमित्त साने गुरुजी रुग्णालयात आधुनिक सेवा व सुविधांचा विस्तार : बालरोग उपचार व स्त्रीरोग उपचार विभाग सुरू - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 25 December 2024

साने गुरुजी जयंती निमित्त साने गुरुजी रुग्णालयात आधुनिक सेवा व सुविधांचा विस्तार : बालरोग उपचार व स्त्रीरोग उपचार विभाग सुरू


किनवट :  साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या २९ व्या वर्धापनदिन  काल(दि.२४) रुग्णालयातील आधुनिक सेवा व सुविधांचा विस्तार च उपचार व स्त्रीरोग उपचार विभाग सुरू करून करण्यात आला.

   या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवाग्राम येथील   जेष्ठ गांधी वादी कार्यकर्ते भरतजी महोदय यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष हाजी इसाखान हे होते.  प्रास्ताविक साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अशोक बेलखोडे यांनी केले.आधुनिक सेवा विस्तार विभागात बालरोगतज्ज्ञ डॉ.योगेंद्र वरटकर व स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.भाग्यश्री बेलखोडे - वरटकर हे सेवा देणार आहेत.याप्रसंगी डॉ.भाग्यश्री चे आई - वडील डॉ.शोभा व मुरलीधर बेलखोडे यांच्यासह प्रा. रामप्रसाद  तौर, अखिल खान,प्रा.डाॅ.सुनिल व्यवहारे,प्रा.डाॅ.शिवाजी गायकवाड ,प्रा.डाॅ.पंजाब शेरे,अॅड.मिलिंद सर्पे ,प्रा.डाॅ.सुरेंद्र शिंदे, पत्रकार  गोकुळ भवरे,गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages