केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना रुपये १५० इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 23 January 2025

केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना रुपये १५० इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना




किनवट : जानेवारी २०२३ पासून शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती दरमहा रुपये १५० प्रमाणे  एपीएल-डीबीटी योजने अंतर्गत अनुदान मिळाले नसतील अशा शेतकरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आपल्या शिधापत्रिकेची छायांकीत प्रत, सोबत कुटुंब प्रमुखाचे बँक खाते क्रमांक, कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची छायांकीत प्रत व ७/१२ उता-याची छायांकीत प्रत सोबत आपला अर्ज संबंधीत रास्तभाव दुकानदारा मार्फत अथवा स्वतः तहसील कार्यालय किनवट, येथिल पुरवठा विभागात येऊन त्वरीत सादर करावा, असे आवाहन तहसीलदार डॉ.शारदा चोंडेकर व पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांनी केले आहे.

    महाराष्ट्र शासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण विभाग यांचे शासन निर्णयान्वये, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत सामाविष्ट न झालेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी २०२३ पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी रुपये १५० इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच प्रतिवर्षी किमान आधारभुत किंमतीत होणा-या वाढिनूसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या तरतुदीनुसार प्रतिमाह प्रतिलाभार्थी सुधारित वाढिव रोख रककम (पुढिल दशकाच्या पूर्णांकात) थेट हस्तांतरीत करण्यात मान्यता देण्यात आली असल्याचे तहसील कार्यालया तर्फे सांगण्यात आले.


No comments:

Post a Comment

Pages