मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे पाच महिन्या पासुन मानधन रखडले , आमदार भिमराव केराम यांना लाडक्या भावाचे निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 8 January 2025

मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे पाच महिन्या पासुन मानधन रखडले , आमदार भिमराव केराम यांना लाडक्या भावाचे निवेदन

 किनवट ता. प्रतिनिधी : 

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण (लाडका भाऊ योजने अंतर्गत) काम करणाऱ्या निधीयुक्त युवक कर्मचाऱ्यांना पाच ते सहा महिन्या पासुन मानधन मिळाले नसल्यामुळे बेरोजगार तरुणांना रोजगार मिळून सुद्धा मानधना अभावी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे दरम्यान किनवट माहुरचे आमदार हे किनवट आगारास भेट दिली असता त्यावेळी महाराष्ट्र शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजने अंतर्गत (ला. भा.) युवकांनी आमदारांना निवेदन दिले यात योजनेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली व विनंती केली कि आमच्या मागण्या मुख्यमंत्र्या पर्यंत पोहचवा व आम्हाला आर्थिक धैर्य प्राप्त होईल व काम करण्याचे बळ मिळेल या वेळी आगाराचे प्रमुख वाय खिल्लारे व एस टी महामंडळ स्टॉफ तर्फे आमदारांचा सत्कार करण्यात आला .


सदरील निवेदनावर गौतम पाटील ,प्रशांत  ठमके ,स्वप्नील दंतवाड, वेदांत कदम ,रुपेश उपलवार ,सागर कोरटलावार ,पद्मनाथ सेलूकर , नेहा डबेवार,श्री सोनवणे,शाम जटाळे, अजय मानकर ,विक्रम राठोड , शिवराम बेले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment

Pages