माता रमाई जयंती निमित्त रविवारी देगाव येथे भीम गीतांच्या जलसा व व्याख्यानाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 21 February 2025

माता रमाई जयंती निमित्त रविवारी देगाव येथे भीम गीतांच्या जलसा व व्याख्यानाचे आयोजन


     नांदेड/प्रतिनिधी - माता रमाई जयंती निमित्त नायगाव तालुक्यातील देगाव येथे रविवारी भीम गीतांचा जलसा व व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका भाग्यश्री इंगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

   नायगाव तालुक्यातील महाराज सयाजीराव गायकवाड नगरी देगाव तालुका नायगाव येथे रविवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य भीम गीतांचा जलसा व व्याख्यान ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन फुले - शाहू -आंबेडकर युवा मंचचे अध्यक्ष अविनाश गायकवाड यांनी केले आहे. कार्यक्रमास उद्घाटक म्हणून नांदेडचे खा.रवींद्र चव्हाण, खासदार नांदेड लोकसभा

आ.राजेश पवार आमदार नायगाव विधानसभा

राजेश देशमुख कुंटुरकर चेअरमन कुंटुरकर शुगर अँड अग्रो.तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी फुले - शाहू -आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेश गायकवाड राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून नायगावचे  तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड,एल.आर.वाजे गटविकास अधिकारी प.स.नायगाव

 यांच्या सह अनेक दिग्गज मंडळी ची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे

   आयोजित व्याख्यानास प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध विचारवंत प्रा. यादव गायकवाड, मराठी वाङमय पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. करुणा जमदाडे,

 प्रा. बलभीम वाघमारे यांचे व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वागताध्यक्ष युवा नेते राहुल गायकवाड मुख्य आयोजक अविनाश गायकवाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages