किनवट : भारतीय संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक दूरदृष्टी असलेले विद्वान होते. भारताच्या संविधानात त्यांनी बदलत्या वेळ - काळानुसार संविधानात बदल करण्याची तरतूद केली, म्हणून भारतीय संविधान बदलत्या युगाला समाऊन घेणारे जीवित दस्तावेज आहे, असे प्रतिपादन विधीतज्ञ ॲड. सचिन भिमराव दारवंडे यांनी केले.
गोकुंदा येथील बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यशाळा, व्याख्यान, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्ये रुजवण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते प्रमुख व्यक्ते म्हणून बोलत होते.
केशवानंद भारती निवड्याचा दाखला देत त्यांनी, भारतीय संसदेला बदलत्या काळानुसार संविधानात बदल करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु, भारतीय संविधानाचा जो मूलभूत गाभा आहे त्यात बदल करण्याचा अधिकार संसदेला नाही. भारताच्या सर्वोच्च व उच्च न्यायालयांनी मूलभूत अधिकाराचा अर्थ लावताना मूलभूत अधिकाराची व्याप्ती कशी वाढवली आहे, याबद्दल ॲड. दारवंडे यांनी उल्लेखनीय निवाड्यांचा व संविधानातील तरतुदीचा दाखला देऊन स्पष्ट केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर होते. उपप्राचार्य तथा सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. पंजाब शेरे विचारमंचावर उपस्थित होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंजाब शेरे सरांनी केले तर
सुत्रसंचलन डॉ.सुलोचना जाधव, आभार डॉ. स्वाती कुरमे यांनी मानले.
भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यानात बोलताना विधीतज्ञ ॲड. सचिन दारवंडे, विचारमंचावर प्राचार्य डॉ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment