डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ मा.कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 22 February 2025

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ मा.कुलपती सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न



छत्रपती संभाजीनगर, दि.२२: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६५ वा दीक्षांत समारंभ शनिवारी दि.२२ थटात संपन्न झाला. मा.उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी स्नाकंतासमोर दीक्षात भाषण केले. तर कुलपती सी.पी.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत शिस्तीत सोहळा पार पडला.


  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत समारंभ मा.कुलपती तथा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.२२) संपन्न झाला. नाट्यगृहात दुपारी चार वाजता  सदर कार्यक्रम सुरु झाला. उपराष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी सुदेश धनखड, खा. डॉ भागवत कराड,  मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. तसेच चार विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महेंद्र शिरसाठ, डॉ.संजय साळुंके, डॉ.वैशाली खापर्डे, डॉ.वीणा  हुंबे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमास प्रकुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, परीक्षा मंडळ संचालक डॉ.भारती गवळी, वित्त व लेखाधिकारी सविता जम्पावाड यांच्यासह  सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास कुलपती नामनिर्देशित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.गजानन सानप, काशिनाथ देवधर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.श्याम शिरसाठ, डॉ.गौतम पाटील, डॉ.भारत खंदारे, डॉ.रविकिरण सावंत, डॉ.अंकुश कदम, नितिन जाधव, बसवराज मंगरुळे, अॉड.दत्तात्रय भांगे, डॉ.योगिता होके पाटील, डॉ.व्यंकटेश लांब, डॉ.अपर्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment

Pages