रेशन कार्ड चालु ठेवण्यासाठी ई-केवायसी करा;तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांचे आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 18 February 2025

रेशन कार्ड चालु ठेवण्यासाठी ई-केवायसी करा;तालुका पुरवठा अधिकारी निलेश राठोड यांचे आवाहन


किनवट,ता.१८ :  रेशन कार्ड चालू ठेवण्यासाठी आणि योजनेचा लाभ घेण्यासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य आहे. जर केलं नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. शिवाय कार्डही अॅक्टिवेट राहणार नाही. त्यामुळे तुम्ही अजूनही केवायसी केलं नसेल तर आताच रेशन दुकानावर जाऊन किंवा  तहसील कार्यालयातील ई-केवायसी सुविधा  केंद्रावर जाऊन तुमचं केवायसी करून घ्या,असे आवाहन तालुका पुरवठा  अधिकारी निलेश राठोड यांनी केले आहे.

    ई-केवायसी का आवश्यक आहे?

ई-केवायसीमुळे रेशन कार्डधारकांची माहिती सरकारला मिळते. तसेच, रेशन कार्ड योजनेत कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा गैरव्यवहार टाळता येतो. रेशन कार्डवर कुटुंबातील सदस्यांची नावे आहेत, त्या सर्वांचे ई-केवायसी करणे आवश्यक आहे.

     ई-केवायसी कशी करावी?

ई-केवायसी करण्याची प्रक्रिया सोपी आहे. तुम्ही खालील पद्धतीने ई-केवायसी करू शकता:

ऑनलाईन: घरी बसून तुम्ही ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकता.

जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन तुम्ही ई-केवायसी करू शकता.

रेशन दुकानदार: तुमच्या रेशन दुकानदाराच्या मदतीने तुम्ही ई-केवायसी करू शकता.

   ई-केवायसीसाठी काय आवश्यक आहे?

रेशन कार्ड

कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड

ओळखपत्र

पत्त्याचा पुरावा

 ई-केवायसीचे फायदे

फसवणूक रोखली जाते: रेशन कार्डचा वापर फक्त योग्य व्यक्तीच करतात, हे सुनिश्चित होतं.माहितीची अचूकता: रेशन कार्डधारकांची माहिती अपडेटेड आणि अचूक राहते.

सोपी प्रक्रिया: ऑनलाईन प्रक्रिया सोपी आणि जलद आहे.

पारदर्शकता: ई-केवायसीमुळे संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राहते.

 २८ फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी करा!


  किनवट तालुक्यातील सर्व रेशन कार्डधारकांना २८ फेब्रुवारीपूर्वी ई-केवायसी करण्याचे आवाहन तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. अंतिम तारखेपर्यंत ई-केवायसी न केल्यास रेशन कार्ड बंद होऊ शकतं.


No comments:

Post a Comment

Pages