अंबाडी येथे 2 मार्च रोजी बौद्ध मेळाव्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 18 February 2025

अंबाडी येथे 2 मार्च रोजी बौद्ध मेळाव्याचे आयोजन



किनवट : भारतीय बौद्ध महासभा शाखा अंबाडी ता.किनवट च्या वतीने दि.२ मार्च रोजी महान संत चिमणाजी महाराज यांची ८८ वी  पुण्यथिती तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त बौद्ध उपासक,उपसिकांनी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायांना उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या जाहीर पत्रकातून केले आहे.

   दरवर्षी येथे अनाथ  पिंडक नगरी , अंबाडी ता.किनवट येथे बौद्ध मेळाव्याचे  आयोजन केल्या जाते  यासाठी मराठवाडा,विदर्भ व तेलंगणा राज्यातून बौद्ध उपासक व उपसिका चिमणाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.

    पहिल्या सत्रात सकाळी  नऊ वाजता उपा.सतिष गिरीधर पाटील यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होईल. दुसऱ्या सत्रात दुपारी चार ते सात यावेळेत भोजनदान होणार आहे.  तिसऱ्या सत्रात सायंकाळी पाच ते सात या वेळेत पूज्य भदंत कीर्ती आंनदबोधी नालंदा बुद्धविहार तळेगाव जि. रायगड, यांचे धम्मदेशना होईल. चौथ्या सत्रात सायंकाळी सात ते नऊ 
या वेळेत भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ.भीमराव आंबेडकर यांचे यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होईल. पाचव्या सत्रात रात्री नऊ वाजेपासून महाराष्ट्रचे ख्यातनाम गायक राहुल शिंदे  (आणि संच पुणे ) व सुप्रसिद्ध सिने नाट्य गायिका निशा धोंगडे (आणि संच चंद्रपूर) यांचा दणदणीत बुद्ध-भीम गीतांचा मुकाबला होईल.असे दिवसभर भरगच्च कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

    कार्यक्रमाचा समारोप गुरुवारी दि.३मार्च सकाळी नऊ वाजता करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजक  भारतीय बौद्ध महासभेचे शाखा अध्यक्ष सतिष गिरीधर पाटील उपाध्यक्ष देविदास भवरे ,सचिव कपिल हलवले, सहसचिव राहुल कयापाक, कोषाध्यक्ष अभय भवरे,सहकोषाध्यक्ष सुरेंद्र घुले,संघटक  मिलिंद मुनेश्वर, सहसंघटक अक्षय ठमके, हर्षद मुनेश्वर, किसन मुनेश्वर, संघपाल  डांबारे ,आनंद तेलंगे,उमेश मुनेश्वर,प्रा.धनराज हलवले,उमेश भवरे,विकास तामगाडगे,पंकज भवरे,प्रेमानंद कानिंदे,उल्हास फुसाटे ,आनंदराव तेलंगे ,उमेश गोविंदा मुनेश्वर 
 यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा शाखा, रमाई महिला संघ व नवयुवक मिञ मंडळ शाखा अंबाडीच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages