सारखणी ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण हटविण्याची नोटीस - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 18 February 2025

सारखणी ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण हटविण्याची नोटीस


किनवट, प्रतिनिधी : तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या सारखणी ग्रामपंचायतीने गावातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक जागांवर केलेल्या अतिक्रमणांवर कारवाईसाठी 17 अतिक्रमणकर्त्यांना अधिकृत नोटीस बजावली आहे.


           प्राप्त माहितीनुसार, सारखणी ग्रामपंचायतीच्या परवानगीशिवाय संबंधित अतिक्रमणकर्त्यांनी मुख्य चौक व रस्त्यांवर अनधिकृतपणे टपऱ्या आणि साहित्य ठेवले आहे. यासंदर्भात यापूर्वीही सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, कोणताही वैध पुरावा न सादर करता अनधिकृतरीत्या अतिक्रमण सुरूच ठेवण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनिय1958 च्या कलम 53 आणि अन्य संबंधित कायद्यांच्या आधारे हे अतिक्रमण त्वरित हटविण्याचे आदेश दिले आहेत. सदर अतिक्रमणधारकांनी सात दिवसांच्या आत स्वतःच्या खर्चाने अतिक्रमण काढून घ्यावे. अन्यथा ग्रामपंचायत स्वतः हे अतिक्रमण हटवेल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल, असे नोटीसीमध्ये बजावले आहे. विशेषतः, छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृत मांस विक्रीच्या दुकानांमुळे वाहतुकीस अडथळा आणि धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडत असल्यामुळे, ही दुकाने बंद करण्यासाठी नियमांचे पालन करून योग्य कार्यवाही केली जाणार आहे.


          या कारवाईसंदर्भात जिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांना देखील माहिती कळविण्यात आली आहे. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे सार्वजनिक रस्त्यांची मोकळीक होऊन नागरी सुविधांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा नागरिकांना आहे. दरम्यान, सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अतिक्रमणकर्त्यांना नोटीस दिल्यानंतर ग्रा.पं.कार्यालयाच्यावतीने अतिक्रमण झालेल्या ठिकाणी मोजमाप घेऊन 33 फुटाच्या मार्गामध्ये चुन्याने ‘सीमांकन’ (मार्कआऊट) करीत दिलेल्या मुदतीत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिलेत. यावेळी सरपंच  सूर्यभान सिडाम, ग्रामसेवक विजय राठोड,  भीमराव महाजन ,   नवीन वाघमारे, ग्रा.पं.कर्मचारी संजय वानखेडे, पीर मोहम्मद, रवी चव्हाण आदी मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment

Pages