किनवट : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ हे काल(ता.१६)किनवट दौऱ्यावर आले होते. यावेळी येथे समाज कल्याण अंतर्गत मागासवर्विगीय विद्यार्थी वसतीगृह मंजूर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन "युवा पँथर ",संघटने तर्फे देण्यात आले.या संदर्भाने रात्री झालेल्या जागतिक धम्म परीषद च्या मंचावर बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी घोषणा केली की,किनवट येथील १०० मुलांच्या क्षमतेच्या व माहूर येथे १००मुलिंच्या क्षमतेच्या वसतिगृहासाठी एकूण २० कोटी रुपये निधी मंजूर करत आहे.३ महिन्यात कार्यवाही करण्यात येईल व येत्या ६ महिन्यात इमारत उद्घाटना साठी मी स्वतः येणार आहे
निवेदन देतांना निखिल कावळे,विनोद भरणे,ॲड. सम्राट सर्पे, गौतम पाटील आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment