किनवट : अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तालुक्यातील २०१ रेशन धान्य दुकानांमधून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना दरमहा अन्नधान्याचे "वितरण केले जाते. ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही ई-केवायसी केलेली नाहीत. जे पात्र लाभार्थी ई-केवायसी करून घेणार नाहीत, ते धान्यापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे २८ फेब्रुवारी ही ई-केवायसी करून घेण्याची शेवटची तारीख आहे. तालुक्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना सुरुवातीपासूनच ई-केवायसी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मंडळनिहाय शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचनाही सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आल्या.
||शिधापत्रिका आधार संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकाचा आधार क्रमांक अचूक आणि तोच आहे का? याची पडताळणी म्हणजे ई-केवायसी होय. पत्ता व ओळखीच्या दृष्टीने ई-केवायसी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी २८ फेब्रुवारीपूर्वी आपली ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा त्यांचा धान्य पुरवठा बंद केला जाईल.||
- निलेश राठोड, पुरवठा अधिकारी, तहसील कार्यालय, किनवट
No comments:
Post a Comment