दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 4 February 2025

दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न


नांदेड दि. 4 फेब्रुवारी :- समाज कल्याण विभाग व नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने कुसुम सभागृहात  आज दि.4 फेब्रुवारीला दिव्यांग मुला-मुलींचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक  स्पर्धेचे उद्घाटन झाले.


 जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी 

 जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव श्रीमती दलजीत कौर जज होत्या .

यावेळी जिल्हा समाज  कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार ओम प्रकाश गिल्डा, डॉ.अजय मालपाणी, बापू दासरी   आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील एकूण 55 शाळांनी सहभाग नोंदवला पारंपारिक लोककला,नृत्य,गायन या सह विविध कला गुणांचे अविष्कार विद्यार्थ्यांनी  सादर केले.




No comments:

Post a Comment

Pages