‘रमाई पहाट’ मैफिलीचे शुक्रवारी आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 4 February 2025

‘रमाई पहाट’ मैफिलीचे शुक्रवारी आयोजन


छत्रपती संभाजीनगर :  त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कलाकारांतर्फे ‘रमाई पहाट’ ही अभिनव मैफल शहरात आयोजित करण्यात आली आहे. या संगीतमय अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील कलावंत आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार आहेत. गीतगायन, वादन, कविता, ढोल, लेझिम, हलगी, फ्लॅश मॉब, रॅप, मल्लखांब डीजेंसह अनेक कलासादरीकरण एकाच ठिकाणी पाहण्याची पर्वणी शहरवाशीयांना मिळणार आहे. ‘रमाई पहाट’ या अभिनव कार्यक्रमाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून येत्या शुक्रवारी, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ ते ११ या वेळात कॅनॉट प्लेस येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्ध गायक कुणाल वराळे, अजय देहाडे,चेतन चोपडे,  सचिन भुईगळ, विजय पवार, अक्षय जाधव यांनी केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून मोफत आहे.

No comments:

Post a Comment

Pages