दहा दिवसिय धम्म उपासिका शिबिराला सुरवात - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 22 February 2025

दहा दिवसिय धम्म उपासिका शिबिराला सुरवात

   


किनवट :  भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा तालुका किनवट येथे आज दि. 22/02/2025  रोजी शनिवारी   दहा दिवसिय धम्म उपासिका शिबिराचे उदघाटन झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राजाराम वाघमारे सर (सरचिटणीस भा. बौद्ध म.) किनवट, शिबिराच्या प्रमुख मार्गदर्शिका  उपा. अनिताताई खंदारे (केंद्रीय शिक्षिका तथा नांदेड जिल्हा महिला अध्यक्षा) नांदेड, शिबिराचे प्रास्ताविक- बौध्दाचार्य महेंद्र नरवाडे सर (जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन व प्रचार विभाग), यांनी केले,  उपा. आम्रपाली वाठोरे (कांबळे) महिला सचिव,    सुत्रसंचालन -महिलाउपाध्यक्षा वंदनाताई तामगाडगे यांनी केले. या वेळी उपा. भारत कावळे सर( कोषाध्यक्ष भा. बौ. म.) किनवट, बौध्दाचार्य अनिल उमरे (संस्कार सचिव भा. बौ. म. ) किनवट, उपा. राहुल घुले (संरक्षण विभाग) किनवट,उपा. बंडू भाटशंकर(वार्ड शाखा अध्यक्ष),  उपा. ॲड. पंडित घुले सर, प्रा.दिलीप पाटील, वार्ड अध्यक्ष कैलास पाटील यांची उपस्थिती होती.शिबिरात गोकुंदा व किनवट परिसरातील राजर्षी शाहू नगर, सिद्धार्थ नगर, पंचशील नगर, डॉ.आंबेडकर नगर, विद्यानगर व एस.व्हि. एम.कालनी येथील असंख्य महिला उपासिका उपस्थित होत्या.              

No comments:

Post a Comment

Pages