नांदेड दि. 14 फेब्रुवारी :- राज्याचे आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके हे किनवट जि. नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वा. यवतमाळ येथून मोटारीने विश्रामगृह किनवट येथे आगमन व लोकप्रतिनिधी, महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व विविध आदिवासी संघटना सोबत बैठक व चर्चा. दुपारी 12 वा. एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, किनवट येथील कर्मचारी व अधिकारी लाभार्थी यांचेसोबत बैठक व आढावा. स्थळ:- उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट. दुपारी 2.30 वा. शासकीय विश्रामगृह किनवट येथे पत्रकार परिषद. दुपारी 3.30 वा. संघकार्यालयास सदिच्छा भेट. दुपारी 4.30 वा. माहूरगड येथे जगंदबामाता दर्शन व भेट. सायं 5.30 वा. यवतमाळकडे प्रयाण करतील.
No comments:
Post a Comment