किनवट :
भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने दि.२२फेब्रुवारी २०२५ ते३मार्च२०२५या कालावधीत सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथे दहा दिवसीय उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सदर शिबिरात केंद्रीय शिक्षिका अनिता ताई कंधारे यांचे दहा दिवस मार्गदर्शन लाभणार आहे.शिबिराचा समारोप भारतीय बौध्द महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ.भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.ज्या इच्छुक महिला उपासिकांना शिबीरात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर नांव नोंदणी करावी असे आवाहन भारतीय बौध्द महासभेचे जिल्हा संघटक तथा तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके साहेब, तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, कोषाध्यक्ष भारत कावळे, संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे,माजी जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment