भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी पृथ्वीजीत सरवदे यांची निवड ; 20 एप्रिल रविवार रोजी सोलापुरात होणार जयंती सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 31 March 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती च्या अध्यक्षपदी पृथ्वीजीत सरवदे यांची निवड ; 20 एप्रिल रविवार रोजी सोलापुरात होणार जयंती सोहळा

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी         यांची निवड ; 20 एप्रिल रविवार रोजी सोलापुरात होणार जयंती सोहळा


सोलापूर :


सालाबाद प्रमाणे ३१ मार्च सोमवारी  एम्प्लॉयमेंट चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हायस्कूलच्या मैदानात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव व विश्वस्त समिती यांची 2025 ची वार्षिक नियोजन बैठक मोठ्या चैतन्यपूर्ण वातावरणात पार पडली.


यंदाच्या वर्षी मध्यवर्ती उत्सव विश्वस्त समितीत ४२५ पेक्षा अधिक सार्वजनिक मंडळे सहभागी होणार असून १५० मिरवणूक निघतील अशी माहिती अध्यक्ष पृथ्वीजीत सरवदे यांनी दिली.


सदर बैठकीची सुरुवात भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली.


बैठकीत 2024 चा जमा खर्च सादर करण्यात आला, त्याचं प्रमाणे 2025 भिम जयंती उत्सवाचा सप्ताह ठरवून,यंदाची जयंती ही सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक आदी क्षेत्रात कार्यक्रम करून साजरा करावी असे मध्यवर्ती च्या वतीने आदेश देण्यात आले.


सर्व मंडळांच्या मागे विश्वस्त समिती ही आज पर्यंत जशी खंबीरपणे उभी आहे तशीच येणाऱ्या काळात आपल्या सोबत असेल असे अश्वस्त केले. 

 

अध्यक्ष:- पृथ्वीजीत सरवदे, कार्याध्यक्ष:- डॉ.सायली शेंडगे,

सचिव:- प्रबुद्धकुमार दोड्यानुर, ऑडिटर:-कपिल बनसोडे, 

खजिनदार:- प्रमिला तुपलोंढे  यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सदर बैठक ही लोकनेते राजाभाऊ सरवदे  यांच्या मार्गदर्शनाखाली , मावळते अध्यक्ष नागेश रणखांबे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.

 या बैठकी मध्ये सामाजिक संस्था,मंडळे,कार्यकर्त्यांच्या वतीने मध्यवर्ती समितीस स्वखुशीने  सभासद वर्गणी जमा करण्यात आली.

या बैठकीस  आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते,मंडळातील सर्व अध्यक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

Pages