बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ नांदेड मध्ये बौद्ध अनुयायांचा महामोर्चा
नांदेड : बिहारमधील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून देशभर आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन महामोर्चा चे आयोजन समस्त बौद्ध अनुयायांच्या वतीने नांदेड मध्ये करण्यात आले होते.
बुद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुध्दांना ज्ञानप्राप्ती झाली होती.त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सम्राट अशोक राजाने महाबोधी महाविहार बांधले. केवळ भारतातीलच नव्हे तर, जगभरातील बौद्ध अनुयायांचे आशा व अस्मिता असलेले हे महाविहार आहे. मात्र या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्ध भिख्खू व बौद्धांच्या ताब्यात द्यावे तसा कायदा करावा,The Bodhagya Temple Act 1949 रद्द करावा तसेच महाबोधी महाविहार ट्रस्ट मध्ये महाराष्ट्रातील एका बौद्ध भिक्खुची प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
अश्या आशयाचे निवेदन भिक्खू संघाच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केंद्रीय गृहमंत्री,बिहारचे राज्यपाल, युनोस्कोचे चेअरमन यांना देण्यात आले. यावेळी समता सैनिक दल व समस्त आंबेडकरी पक्ष संघटनेच्या नेत्यांसह उपासिका , उपासक लाखोंच्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
No comments:
Post a Comment