भारतीय बौद्ध महासभेचे डॉ.भीमराव आंबेडकर यांचा नांदेड जिल्हा दौरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 1 March 2025

भारतीय बौद्ध महासभेचे डॉ.भीमराव आंबेडकर यांचा नांदेड जिल्हा दौरा


किनवट .: भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ भिमराव आंबेडकर शनिवारी(ता.१) मुंबई येथून नंदिग्राम एक्सप्रेसने मुदखेड रेल्वे स्टेशन येथे आगमन शहरात भारतीय बौद्ध महासभा धम्म परिषद प्रमुख उपस्थिती दूपारी १२  वाजता धम्म परिषदेचे उद्घाटन नंतर किनवट कडे मोटारीने प्रयान करतील किनवट येथे विश्रामगृहात सायं ५वाजता आगमन २ मार्च रोजी सांयकाळी अंबाडी(ता.किनवट)येथील ऐतिहासिक बौद्ध मेळावा तथा महान संत चिमणाजी महाराज यांच्या ८८ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. ता.३ मार्च रोजी सकाळी १० वाजता सम्राट अशोक बुध्द विहार, राजर्षी शाहू नगर, गोंकूदा(ता.किनवट)येथील संविधान दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धम्म संस्कार महिला उपासिका शिबिरांच्या समारोह प्रसंगी डॉ. भिमराव आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच दिवसी नंदिग्राम एक्सप्रेसने मुंबई  कडे जाणार आहेत. नांदेड, आदिलाबाद ,यवतमाळ येथील समता सैनिक दल संरक्षणाची मानवंदना देणार आहे त्यांच्या सोबत डॉ . यशवंतराव चावरे, विभागीय संघटक,डी.एस.नरसिंगे, विभागीय संघटक,अभियंता प्रशांत ठमके, जिल्हा संघटक तथा तालुका अध्यक्ष,गणपत गायकवाड, जिल्हा अध्यक्ष,दामोदर सरकटे, जिल्हा सरचिटणीस,प्राचार्य राजाराम वाघमारे, तालुका सरचिटणीस,केंद्रीय शिक्षिका अनिता खंदारे ,महेंद्र नरवाडे, भारत कावळे, राहुल घूले, अनिल उमरे, वसंत सरपे, जिंतेद्र भवरे, प्रेमानंद कानिंदे हे उपस्थित राहणार आहेत.


No comments:

Post a Comment

Pages