ज्ञानदेव दुगाळे वायपनेकर यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 20 March 2025

ज्ञानदेव दुगाळे वायपनेकर यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार

नांदेड (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस पाटील संघ नांदेड जिल्हा यांच्यावतीने वायपना बुद्रुक येथील ज्ञानदेव नारायण दुगाळे यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते नुकताच देण्यात आला आहे. 

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघाच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार आदर्श काम करणाऱ्या पोलीस पाटील यांना देण्यात येतो. यंदा हदगाव तालुक्यातील वायपना बुद्रुक येथील ज्ञानदेव नारायण दुगाळे यांच्या कामाचे मूल्यमापन करण्यात आलं. त्यांच्या स्पर्धेत अनेक पोलीस पाटील यांचे प्रस्ताव होते. त्यातून त्यांची निवड केली. ज्ञानदेव दुगाळे यांना अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते आदर्श पोलीस पाटील पुरस्कार देण्यात आला. पुरस्काराचं स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असं होतं. यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, जिल्हा अध्यक्ष भास्कर पाटील कंकाळ, सचिव संभाजी पाटील मंडळीकर, हदगाव तालुका अध्यक्ष सुभाष पवार, उपाध्यक्ष दत्तात्रेय चंदनवार, सचिव प्रल्हाद कदम यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस पाटलांची उपस्थिती यावेळी होती. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages