किनवट,दि.१२ : नांदेड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नविन शासकीय ईमारतीतील वाचनालयास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, तसेच नवीन ईमारतीतील प्रांगणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी करणारे निवेदन आज(दि.१२) किनवट न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षांना पाठविण्यात आले.
निवेदनावर किनवट न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष आर.डी.सोनकांबळे, सचिव एस.पी .सिरपुरे, जेष्ठ वकील सुभाष ताजने, टी.एच.कुरेशी यांच्यासह अनेक वकीलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment