नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त मानव कल्याण विचारमंचच्या वतीने उद्या दिनांक 23/04/2025 बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता कुसुम सभागृहात सुप्रसिद्ध भीम शिव शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर यांच्या आंबेडकरी शाहिरी जलशाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जगनराव गोणारकर (अध्यक्ष मानव कल्याण विचारमंच नांदेड) उद्घाटक मा.राहुल प्रधान, (अध्यक्ष युवा पँथर म. राज्य) तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सचिन सरोदे (अध्यक्ष प्रागतिक विचार मंच नांदेड) डॉ. राजेंद्र गोणारकर,( महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा संचालक माध्यमशास्त्र संकुल स्वा रा ती विद्यापीठ नांदेड) हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मानव कल्याण विचारमंचाचे सचिव प्रा. अशोक कांबळे, कोषाध्यक्ष इंजी राहुल गोणारकर, उपाध्यक्ष सुमेध शिरसे, सहसचिव साहेबराव कांबळे, डॉ. मिलिंद पांडुरनीकर जीवनराव कांबळे, संजय वाघमारे, प्रा. गंगाधर भोपाळकर, राजीव वाघमारे, विलास कांबळे, गणेश कांबळे, संभाजी वाघमारे, एमटी वाघमारे, संतराम टोम्पे, संतोष शिरसे, रवींद्र शिरसे, बी. एन.वाघमारे, सुधीर वाघमारे, पंडित आंबेकर, आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment