किनवट ( प्रतिनिधी ) :
तालुक्यातील उमरी बाजार येथील त्रिरत्न बुद्ध विहारात वैशाख पोर्णिमा, बुद्ध पोर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती निमित्त जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध यांच्या रुपाची गावातील प्रमुख मार्गाने बुद्धम् शरणम् गच्छामि, धम्मम शरणम गच्छामि, संघम शरणम् गच्छामि. अशा जयघोषात शांततेत मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर येथील त्रिरत्न बुद्धविहारात बुद्धरूपाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कांबळे, बुद्ध फुले आंबेडकर स्मारक समितीचे पुंडलिक मुनेश्वर, सुभाष जाधव, गणपत भगत, कविराज पाटील, मनोहर भवरे, उमेश मुनेश्वर, सजन कांबळे, भारत मुनेश्वर, जीवन कांबळे, भारतीय बौद्ध महासभा किनवट शाखेचे दिलीप भगत, रुपेश मुनेश्वर, रमेश मुनेश्वर आदी उपस्थित होते. बौद्धाचार्य संजय पाटील आणि रविंद्र पाटील यांनी बुद्धवंदना धम्म विधी घेतली. त्यानंतर सुग्रास खीरसह स्नेहभोजन पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य सुबोध थोरात यांनी तर आभार भारतीय बौद्ध महासभा उमरी शाखेचे सदस्य राजेश मुनेश्वर यांनी मानले. हा सुंदर कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने झाल्याचे गौतम उमरे आणि रमेश जाधव यांनी सांगितले.
विशेष सहकार्य आणि यशस्वीतेसाठी रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा रेखा सुभाष जाधव, रूपाली दिनेश नरवाडे, ज्योती सदाशिव कानिंदे, विजयमाला ज्ञानेश्वर जाधव, रोशनी शुद्धोधन भवरे, भावना गौतम भूरे, सीमा मुकेश मुनेश्वर, वंदना सिद्धार्थ देवताळे, उमा रमेश जाधव, अंजना गौतम उमरे, रतिका उल्हास पाटील, माया संजय भवरे, अनिता भारत भूरे, रत्नप्रभा श्रावण परेकार, वनिता राजेश मुनेश्वर, रत्नप्रभा भारत मुनेश्वर, निशा जीवन कांबळे, करुणा सजन कांबळे, वैशाली विठ्ठल फुलझेले, पुण्यरता उत्तम भवरे, मुद्रूका कविराज पाटील, बेबी गोविंद डोंगरे, शारदाबाई सुदाम कांबळे, भारती राजरत्न घुले, गीता उल्हास भूरे, वैशाली धम्मपाल भगत, बेबी नारायण भवरे, लिलाबाई अशोक फुलझेले, चरित्रा रतन फुलझेले, सत्वशीला गोविंद उमरे, वर्षा श्याम जाधव, इंदू सुबोध थोरात, गंगूबाई पुंडलिक मुनेश्वर, हर्षलता दिलीप भगत, रोहिणी रमेश मुनेश्वर, विजया ज्ञानेश्वर जाधव, लक्ष्मीबाई मुनेश्वर, सुनंदा पाटील, लिलाबाई कानिंदे, कौशल्याबाई पाटील, पंचफुला मनोहर भवरे, आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment