आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रंथदान सोहळ्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 23 May 2025

आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताने ग्रंथदान सोहळ्याचे आयोजन

        


नांदेड  ( प्रतिनिधी ): आंबेडकरवादी चळवळीतील निस्सीम त्याग  व समर्पण करणारे ,विद्यार्थी आणि व तरुणांचे आदर्श स्थान शिक्षण क्रांती करत 18 तास आंबेडकरवादी मिशन केंद्रात व इतरत्र शाळेतही उपक्रम राबविणारे प्रशासक बना हा मूलमंत्र देणारे आंबेडकरवादी मिशन चळवळीचे प्रणेते तथा प्रमुख दीपक कदम, यांचा वाढदिवस 25 मे 2025 रविवारला असून त्या दिवशी सायंकाळी 6 वाजता आंबेडकरवादी मिशन केंद्रावर ग्रंथदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.




दिपक कदम यांनी अधिकारी पदाचा राजीनामा देऊन अविवाहित राहून वडिलोपार्जित शेती घर व संपत्ती आंबेडकरवादी चळवळी समर्पित करून शेकडो गरीब बहुजन वर्गातील विद्यार्थ्यांना आय ए एस IAS आय पी एस  IPS घडवुन आणण्याचे काम केले. असून सदर काम आजही नेटाने पुढे नेण्याचे कार्य त्यांच्या हातून चालू असून आंबेडकरवादी मिशन केंद्रातील अनेक विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत या माध्यमातून पास होऊन अधिकारी झालेले आहेत. 25 मे रोजी त्यांच्या वाढदिवस चे आयोजन करण्यात आले असून सदर वाढदिवस आगळावेगळा स्वरूपात आहे येथे वाढदिवसा ला येणाऱ्या हितचिंतकांनी तथा चाहत्यांनी येताना हार अथवा बुके न आणता त्यांना मंगलमय शुभेच्छा देण्याकरिता पुस्तके आणली ते स्वीकारल्या जातील 25 मे रोजी होणाऱ्या वाढदिवसाला बहुसंख्य चाहत्यांची उपस्थिती लाभणार असून त्यांनी येताना पुस्तक स्वरूपी भेट स्वीकारल्या जाईल असे एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आव्हान माननीय रमेश चित्ते , इंजिनिअर शिवाजी सोनकांबळे, इंजिनिअर प्रकाश नगारे   संघमित्रा सोनकांबळे, देविदास रंगदळ, विद्या पवळे  जीवक तारू, निखिता गुजरवार ,नंदा वाघमारे  यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages