मातोश्री कमलताई ठमके महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम,९१.६१ टक्के निकाल,गुणवत्तेत मुलींची बाजी.! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 7 May 2025

मातोश्री कमलताई ठमके महाविद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम,९१.६१ टक्के निकाल,गुणवत्तेत मुलींची बाजी.!


किनवट :

१२ वी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत गोकुंदा येथील मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीदेखील  उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.कला व विज्ञान शाखेचा मिळून ९१.६१. टक्के निकाल लागला असून यावर्षी गुणवत्तेत मुलींनी बाजी मारली आहे.


महाविद्यालयाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात विज्ञान शाखेतुन  एकुण ९८ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते. पैकी ९७ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले असून ९८.९८ टक्के निकाल  लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त) ३९,(७५%पेक्षा जास्त) ०४ एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले. 


विज्ञान शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.फाळके तनुश्री शामराव -८४.६७% ही प्रथम,कु.पठाण शरेफारमीन महेमुद खान  ८१..६७ % ही व्दितीय तर कु. हुलकाने दुर्गा प्रकाश हीने ७६.००% गुण घेवून तृतीय क्रमांक  पटकावला आहे. 


कला शाखेतुन  एकुण ४५ विद्यार्थी हे परीक्षेस प्रविष्ट होते पैकी ३४ विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले. ७५.५६% टक्के निकाल हा कला शाखेचा लागला.यामध्ये प्रथम श्रेणी (६०%पेक्षा जास्त)  ०३ ,(७५%पेक्षा जास्त) ०१ ,  एवढे विद्यार्थी गुणानुक्रम उत्तीर्ण झाले. 

कला शाखेतुन सर्वाधिक गुण घेवून कु.दहिफळे वैशाली मारोती -७७.१७% ही प्रथम,कु.राठोड काजल वसंतराव ६८.१७% ही व्दितीय तर जाधव सोनाली दिपक हिने ६४.००%  गुण घेवून तृतीय क्रमांक  पटकावला आहे.विज्ञान शाखेतुन उद्यानविद्या शास्त्र या विषयात सलगरकर सक्षम हनमंतराव याने २०० पैकी २०० गुण प्राप्त केले आहे.

विज्ञान शाखेचा  ९८.९८% तर कला शाखेचा ७५.५६ % असा एकूण ९१.६१ टक्के निकाल लागला आहे.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल  संस्थेचे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके, सचिव शुभांगीताई ठमके, प्राचार्या स्वाती बनसोड व महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

Pages