जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी वकील संघाने घेतली मुख्याधिकारी तथा प्रशासकाची भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 7 May 2025

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीसाठी वकील संघाने घेतली मुख्याधिकारी तथा प्रशासकाची भेट


किनवट,दि.७ : मंजुर असलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीसाठी किनवट न्यायालय वकील संघाच्या शिष्टमंडळाने आज(दि.७) नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ.अजय कुरवाडे  यांची भेट घेऊन न्यायालयाच्या इमारती संदर्भाने सविस्तर चर्चा केली.

      यावेळी डॉ.अजय कुरवाडे यांनी ईमारती संदर्भाने आवश्यक ते सहकार्य आपण सुरुवातीपासूनच करत आलेलो आहोत , यापुढे ही करणार आहोत, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

      यावेळी शिष्टमंडळात वकील संघाचे अध्यक्ष किशोर मुनेश्वर, उपाध्यक्ष टेकसिंग चव्हाण,सचिव माज बडगुजर, आकाश कोमरवार,वकील संघाचे माजी सचिव पंकज गावंडे,माजी उपाध्यक्ष मिलिंद सर्पे यांचा समावेश होता.


No comments:

Post a Comment

Pages