डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालयाच्या परिसरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा ; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 13 June 2025

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समाज कल्याण कार्यालयाच्या परिसरात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा ; रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


नांदेड, प्रतिनिधी दि. 13 : 

सामाजिक न्याय भवनातुन समाजाच्या मागास वंचित घटकांना न्याय देण्याचे काम चालते सामाजिक न्याय भवनाच्या भव्यदिव्य इमारती समोर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणे संयुक्तीक ठरेल कारण बाबासाहेबांनी आपले संपुर्ण आयुष्य खर्ची घातले तसेच संविधानाच्या माध्यमातुन प्रत्येकाला न्याय मिळवुन देण्याचे काम केले सामाजिक न्याय भवनात येणाऱ्या प्रत्येकाला या कार्याप्रती कृतज्ञता व न्यायाची जाणीव व्हावी म्हणुन नांदेड तसेच सर्व महाराष्ट्रातील कार्यालय परिसरात पुतळा उभारण्यात यावा  अश्या आशयाचे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.


यावेळी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश सावते, जिल्हा महासचिव अजय खिल्लारे,जिल्हा उपाध्यक्ष यश घुले अभिजित दुधमल,सोनु खंदारे,प्रदिप पवार त्रिशरण सोनकांबळे,आतिश वाघमारे,गणपती वाघमारे, रितेश डुमणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages