महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 6 June 2025

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी दिली बार्टी संस्थेस भेट


पुणे  - दिनांक ५ जून प्रतिनिधी  ,

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेली (बार्टी) ही महाराष्ट्र शासनाची महत्वपूर्ण संस्था असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सामाजिक समतेचा विचार व भारतीय संविधानाचा प्रसार व प्रचार करत असुन अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी काम करते. बार्टीने विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा व कौशल्य विकास तसेच माहिती तंत्रज्ञान आयआयटी क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन विद्यार्थी घडवावेत असे मत विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष श्री. आनंदराज आंबेडकर यांनी बार्टी संस्थेस बोलताना व्यक्त केले.




डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे येथील मुख्यालयात दिनांक ५ जून रोजी त्यांनी सदिच्छा भेट दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले.

बार्टी संस्थेचे महासंचालक श्री. सुनील वारे यांनी त्यांना "महामानव" हा ग्रंथ व पुष्पगुच्छ भेट देऊन सन्मानित केले.

यावेळी मा. महासंचालक यांनी बार्टी संस्थेतील विविध योजनाची माहिती दिली.


नुकतेच बार्टीतील ११ विद्यार्थी हे UPSC  व २ विद्यार्थी भारतीय नागरी सेवेत उत्तीर्ण झाले तसेच १९ विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परिक्षेत उत्तीर्ण होऊन IIT मध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आणि २२ हजार विद्यार्थी हे वेगवेगळे प्रशिक्षण घेत आहेत. माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जिवनातील अनेक पैलू बार्टी रमाई प्रकल्पाद्वारे संशोधन करत असल्याचे सांगितले.

मा.आनंदराज आंबेडकर यांनी बार्टीतील योजनांची माहिती घेऊन मा. महासंचालक श्री. वारे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.



विभागप्रमुख श्री. दादासाहेब गिते,  श्री. अनिल कारंडे, रिपब्लिकन सेनेचे श्री. संजय बावधानकर, विवेक बनसोडे, युवराज बनसोडे, हनुमंत पपुल, विशाल मस्के, कमलेश चाबुकस्वार, मालोजी भेदेकर यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. रामदास लोखंडे यांनी केले. 

No comments:

Post a Comment

Pages