नांदेड,२६ जुन :- नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने आज दि.२६ जुन २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता थोर समाज सुधारक आरक्षणाचे जनक “राजर्षि शाहु महाराज” यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावडेवाडी नाका येथील पूर्णाकृती पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपायुक्त सुप्रिया टवलारे,उपायुक्त नितीन गाढवे, उपआयुक्त स.अजितपालसिंग संधु,कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर,उद्यान अधिक्षक डॉ.फरहतुल्ला बेग, सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक क्षेत्रिय अधिकारी गौतम कवडे यांच्यासह मनपाचे कर्मचारी व शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment